---Advertisement---

सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोदी सरकारनं केली मोठी घोषणा

---Advertisement---

नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी ७ वा वेतन आयोग व डीएच्या वाढीची वाट पाहत असतांना मोदी सरकारने आज केेंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना डी-स्ट्रेस, रिफ्रेश आणि रीफोकस होण्यासाठी शॉर्ट टाइम ‘वाय ब्रेक’ अर्थात ’योगासाठी वेळ’ घेण्याचा सल्ला दिला आहे. यात कर्मचार्‍यांना आपल्या ऑफीसमधील जागेवरच योग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात, केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि विभागांना कामाच्या ठिकाणीच योग प्रोटोकॉलचा अवलंब आणि प्रचार करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात एक अधिसूचना जारी करून कार्यालयातील खुर्चीवर बसूनच योगा करण्यास सांगण्यात आले आहे. मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना कार्यालयीन कामातून वेळ काढून ध ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाकडून कामाच्या जागेवर कर्मचार्‍यांना ध-ब्रेक घेण्याचा सल्ला डी-स्ट्रेस, रिफ्रेश आणि री-फोकस्डसाठी देण्यात आला आहे. यासाठी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात, ‘Y-Break@workplace संदर्भात जनजागृती पसरवण्यासाठी भारत सरकारमधील सर्व मंत्रालयांना आणि विभागांना आवाहन करण्यात आले आहे. या आदेशात यूट्यूबवरील खालील लिंक्सचा उल्लेख करण्यात आला आहे.

https://youtu.be/2zBEUqc7nCc
https://youtu.be/aqYJR8HnSJI
https://youtu.be/I8YBnxWjHbg

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment