मुंबई : सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार ही केवळ अफवा आहे. मंत्र्यांनी शक्यतो वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत. समाजात जाती आणि धर्मांमध्ये कोणताही तेढ निर्माण होऊ न देण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी नेत्यांनी विरोधी भुमिका घेतली आहे. यावर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी संवाद साधला.
https://youtu.be/1vPDIEs15wk?si=-FHGtN-ujnw2OPyw/
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल जोवर येत नाही तोपर्यंत कोणीही यावार वक्तव्य करू नये. महाराष्ट्राची एक पुरोगामी परंपरा आहे. त्यामुळे समाजात जाती आणि धर्मांमध्ये कोणताही तेढ निर्माण होऊ न देण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. बैठकीनंतर महायुतीमध्ये समन्वय नसेल आणि मतभेद बाहेर येत असतील तर हे योग्य नाही. दिवाळीमध्ये राज्याचे वातावरण बिघडू नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. मंत्र्यांनी शक्यतो वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत. महायुतीमध्ये विसंवाद असल्याचं चित्र जनमानसात जाऊ नये यासाठी मंत्र्यांनी आपापसांतील समन्वय बिघडवू नका. यासह दोन समाजांत जातीय तेढ निर्माण होणार नाही, याचं भान सर्व मंत्र्यांनी ठेवावे आणि जबाबदारीने वक्तव्य करावे.” अशी समज यावेळी शिंदेंनी दिली.