मुंबई । १ एप्रिलपासून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन दर आज म्हणजेच १ एप्रिल पासून लागू झाले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसताना पाहायला मिळत होता. मात्र, आता तीन महिन्यानंतर गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 1 एप्रिल 2024 रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात 30.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
या कपातीनंतर दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरचा दर 1764.50 रुपये झाला आहे. पूर्वी तो 1795 रुपये होता. त्याच वेळी, चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1930 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याच वेळी, मुंबई आणि कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1717.50 रुपये आणि 1879 रुपये झाली आहे.
मोठ्या शहरांमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत किती?
14.2 किलोचा घरगुती LPG सिलिंडर दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या 9 मार्च रोजी सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. त्याचवेळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात जाहीर करण्यात आली.