जळगाव । अलीकडेच अर्थसंकल्पानंतर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली होती,चांदीही स्वस्त झाली होती. पण जागतिक घडामोडीमुळे सोन्यासह चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्णपेठ बाजारात सोन्याचा दर पुन्हा एकदा ७३ हजारांवर गेला आहे.
जळगावच्या सुवर्णपेठत सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात तेजी पाहायला मिळाली. कालच्या किमतीपेक्षा आज सोन्याच्या दरात ५०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आलीय. यामुळे आता जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ६७,१०० रुपये इतका आहे. कालच्या सकाळच्या सत्रात ६६,६०० रुपये इतका होता. तर २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७३,२०० रुपये इतका आहे. काल सकाळी हा दर ७२,६५० रुपये रुपये इतका होता. गेल्या आठवड्याभरात सोने २४०० ते २५०० रुपयांनी वाढले आहे.
दुसरीकडे चांदीचा दर देखील वाढला आहे. दिवसभरात चांदीचा दर एक हजाराने वाढला असून यामुळे आता एक किलो चांदीचा दर ८७,००० रुपयांवर पोहोचला आहे.