सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर आज सोने-चांदी पुन्हा महागली ; पहा नवीन दर

मुंबई । सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार सुरु आहे. सलग तीन दिवस घसरण झाल्यांनतर आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी भारतीय सराफा बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ दिसून आली.

आज गुरुवारी (२ नोव्हेंबर) सराफा बाजाराला हिरव्या निशाणीने सुरुवात झाली. या काळात सोन्याच्या दरात 80 रुपयांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली, तर चांदीच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,972 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. चांदीचा भाव किलोमागे 72,050 रुपये झाला.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत बुधवार, १ रोजी चांदीच्या भावात तब्बल एक हजार ४०० रुपयांनी घसरण दिसून आली. यामुळे एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी ७१ हजार ६०० रुपये प्रति किलोवर आली. दुसरीकडे सोन्याच्याही भावात काल बुधवारी ३०० रुपयांची घसरण झाली. यामुळे ६१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.