सलग पराभवांमुळे बंगरुळु संघ आक्रमक; हैदराबादला रोखणार ?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सहा सामन्यांमधून फक्त एका लढतीत विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसमोर आज सनरायझर्स हैदराबाद संघाचे आव्हान असणार आहे. हैदराबाद संघाने सलग दोन लढतींत विजय मिळवला असून आता त्यांचा संघ विजयाच्या हॅट्‌ट्रिकसाठी सज्ज झाला असेल. तर दुसरीकडे सलग पराभवांमुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु केवळ विजयाचा शोधात आहे. यामुळे आजचा सामना हा रंगतदार होणार हे नक्की.

काय म्हणाले व्हिटोरी ? 
यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूची सुरुवात खराब झाली असली तरी या संघाविरुद्ध गाफील राहून चालणार नाही. बंगळुरूला नमवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावाच लागेल,’ असे हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनिएल व्हिटोरी यांनी सांगितले.

व्हिटोरी म्हणाले की, ‘माझ्या मते कोणताही संघ बंगळुरूला कमी लेखत नाही. तो खूप चांगला संघ आहे आणि यासाठीच आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. बंगळुरू नक्कीच मागील सामन्यातून शिकतील आणि ते आता अधिक धोकादायक बनू लागले आहेत. गोलंदाजीच्या दृष्टीने आमच्यावर दबाव असेल, कारण ते अत्यंत आक्रमक झाले आहेत. सलग पराभवांमुळे आता त्यांना केवळ विजयाचा शोध आहे.