---Advertisement---

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, पोलिसांनी कसे पकडले ?

---Advertisement---

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याच्या प्रकरणात मोठे यश मिळाले, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधील भुज येथून दोन आरोपी शूटर्सना अटक केली. 14 एप्रिल रोजी मुंबईतील पॉश भाग असलेल्या वांद्रे पश्चिम येथील अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती.

मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा गुजरातमधील भुज येथे पकडण्यात आले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांनाही पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment