सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

xr:d:DAFtd8oCXa8:2715,j:5553363274357069179,t:24041509

सलमान खानच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी अनुज थापन याने आत्महत्या केली आहे.

अनुज थापनला पंजाबमधून अटक करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्रे पुरवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अनुज थापनने गुन्हे शाखेच्या कोठडीत आत्महत्या केली. अवघ्या आठवडाभरापूर्वी पोलिसांनी कारवाई करत पंजाबमधून दोन आरोपींना अटक केली होती. यामध्ये 37 वर्षीय सोनू सुभाष चंद्रा आणि 32 वर्षीय अनुज थापन यांचा समावेश आहे.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 11 ते 12 च्या सुमारास अनुज थापनने बाथरूममध्ये गळफास लावून घेतला. यानंतर त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी अनुज थापनचा मृत्यू झाल्याचे सांगितले.