– डॉ. विवेक राजे
Hindu Tolerance कुठल्या तरी एका ग्रुपने कुणातरी एका तथाकथित मुस्लिम विचारवंताला चर्चेसाठी बोलावले होते. ब-याच लोकांना आमंत्रण होते. कोणीतरी नाव सुचवले म्हणून मीही गेलो होतो. हे मुस्लिम विचारवंत स्वीडनमध्ये स्थायिक झालेले, पाकिस्तानमध्ये जन्मलेले प्रोफेसर होते. Hindu Tolerance भारताच्या फाळणीवर त्यांच्या एका पुस्तकाच्या आधारे ही चर्चा होणार होती. त्या पुस्तकात त्यांनी त्यांचे निष्कर्षदेखील काढलेले आहेत. चर्चेला सुरुवात करताना त्यांनी काही विधाने केली. हे करत असताना सगळेच उच्चशिक्षित मुस्लिम विचारवंत करतात तशीच मांडणी त्यांनी केली. Hindu Tolerance ही मांडणी करताना नेहमीच एक अतिशय उदार पवित्रा घेतला जातो. तो म्हणजे इस्लाममध्ये काही दोष आहेत, पण हिंदू धर्मात मात्र खूपच दोष आहेत. जसे की जातिवाद. या जातिवादामुळे अनेक शकले झालेला हिंदू समाज आजही दिसतो आहे तसेच ७०० वर्षे मुस्लिम राजवट असूनही धर्मांतर फक्त १९/२० टक्केच झाले. यावरून मुस्लिम राजवटी उदारमतवादी होत्या. त्यांनी जिझिया कर हिंदू लोकांवर लावला, पण एकदा तो कर भरला की मग त्या हिंदू माणसाला काही उपसर्ग ते पोहोचवत नसतं वगैरे वगैरे. प्रश्नोत्तरांदरम्यान जमलेल्या लोकांनी त्या तथाकथित उदारमतवादी मुस्लिम विचारवंताला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. Hindu Tolerance पण अंगभूत असलेली सभ्यता आणि हिंदू उदारता दाखवत, तो आपल्याकडे ‘पाहुणा’ म्हणून आला आहे, असा विचार करीत चर्चा आवरती घेतली.
हे मुस्लिम विचारवंत आणि लिबरल लोक साधारणपणे नेहमीच फक्त हिंदू समूहांमध्येच जातात. तिथे उगाचच हिंदूंच्या सभ्यतेचा फायदाच उचलत काही तर तत्त्वज्ञान पाजळतात. हिंदू समाजाला संयमाचे डोस पाजत असतात, असा सरसकट अनुभव आहे. Hindu Tolerance स्वतः पाकिस्तानात न राहता स्वीडनमध्ये राहायचं आणि भारतातील संयमी किंवा नेभळट हिंदूंना उपदेश करायचा, ही यांची पद्धत असते. मुस्लिम समाज काय करतो यावर ते भाष्य करीत नाहीत. भारतात आणि जगभरातील मुसलमानांनी आक्रमक होऊ नये हे बोलण्याची यांची हिंमत नसते. भारतीय मुस्लिम समाजाने यांनी लिहिलेलं एखादं चिठोरंही वाचलेलं नसतं. यांना भारतीय मुस्लिम प्रबोधनासाठी वा चर्चा करण्यासाठी बोलवतही नाहीत. हिंदू समाजातील लोकांना मात्र यांचं कोण कौतुक असतं. मांडणी करताना हे साम्यवादी इतिहास मांडतात. Hindu Tolerance म्हणजे ७०० वर्षे भारतात मुस्लिम राजवट होती, असं हे सरसकट ठोकून देणार. वास्तविक ७०-८० टक्के भारतीय भूभागावर, इस्लामी राज्य फक्त औरंगजेबाच्या कारकीर्दीतच होते. पण हे सरसकट ७०० वर्षे मुस्लिम राजवट होती हे ठोकून देणार! हिंदू समाज जातिपातींमध्ये विभागला होता, हे छातीठोकपणे सांगणार. पण मुस्लिम समाजही जातिपातींमध्ये विभागला होता आणि आहे, याकडे डोळेझाक करणार. हिंदू समाज हा जातिपातींमध्ये नाही तर छोट्या-मोठ्या राज्यांमध्ये विभागला होता, हे लक्षात न घेता हिंदू श्रोतेदेखील त्यांना ऐकून घेतात.
Hindu Tolerance हिंदू समाज जातिपातींमध्ये विभागला असता तर औरंगजेबाची कबर याच मातीत खोदली गेली नसती तसेच पेशव्यांबरोबर लाखाची फौज पानिपतावर लढली नसती. आपल्याकडून काय चूक घडली याची जाणीव झाल्यानंतर युद्धोत्तर सुरजमल जाटांनी मराठी सैन्याला आपल्या राज्यात आश्रय दिला नसता. हे आणि असे निष्कर्ष काढण्याची वेळ आली आहे. पण आम्ही आक्रमकपणाने हिंदू समाजाच्या सांगितल्या जाणा-या दोषांचा प्रतिवाद करीतच नाही. उलटपक्षी, ते पाहुणे आहेत, त्यांचा मान राखायला पाहिजे असा तद्दन मूर्ख आणि भेकड पवित्रा घेण्यात हिंदू समाजाने धन्यता मानणे, हीच जणू आमची परंपरा होती आणि आहे, अशा समजुतीत आम्ही वावरत असतो. Hindu Tolerance कितीही उपमर्द किंवा अपमान केला गेला तरीही आम्ही सहिष्णुतेच्या पडद्याआड भेकडपणे गप्पच राहात असू तर जग सातत्याने आमच्याच घरात येऊन, आमच्याच देशात येऊन, आमचाच अपमान करत राहील, हे आम्हाला कळणार तरी कधी? लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी शाहरुख खानने केलेली कृती केवळ औचित्यभंगच नव्हता तर समस्त हिंदू समाजाचा उपमर्द होता, याची आम्हाला कधी तरी जाणीव व्हायलाच हवी आहे. Hindu Tolerance अगदी काल-परवाच कोणी तथाकथित पुरोगामी पत्रकार या देशाच्या वैज्ञानिकांना अकारण वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, असे म्हणाला. अशी किती उदाहरणे देता येतील. याची जाणीव सर्वसामान्य हिंदू माणसाला होणं आवश्यक आहे. कारण, जाणीव झाली तरच समाज कृती करतो.
आमच्या नाकर्तेपणामुळे आमच्याच देशात राहून आमच्याच आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे साहस केले जाते. आमच्या कृतिशून्यतेतूनच लव्ह जिहाद, लँड जिहाद यांसारख्या योजना आकाराला येतात, याची हिंदू समाजाला कधीतरी जाणीव व्हायलाच हवी. पण… अनेक शाळांमध्ये शिस्तीच्या नावाखाली कपाळी टिळा लावता येणार नाही, असा आक्षेप घेतला जातो. पेहराव म्हणून मुलींना विशिष्ट प्रकारचे स्कर्टच वापरणे अनिवार्य केले जाते. Hindu Tolerance त्याच वेळी हिजाब वापरायला मात्र परवानगी दिली जाते. कोणीतरी राजकीय नेता हिंदू धर्माविषयी काहीही बरळतो. कुणी अभिनेत्री उगाचच हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करते. कोणीतरी चित्रकार हिंदू देवतांची बीभत्स पेंटिंग्ज काढतो. कोणीतरी राजकीय नेता अर्धा तास पोलिस बाजूला काढा मग बघा… अशी धमकी वजा वल्गना करतो. एका पक्षाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. अचानक औरंगजेबासारख्या धर्मांधाला सुफी संत म्हणून गौरविले जाऊ लागते आणि हे सगळं सहिष्णुतेचा बुरखा घेऊन हिंदू समाज, हिंदू संघटना, हिंदू नेतृत्व, हिंदू विचारवंत गुपचूप सहन करतात. Hindu Tolerance खरोखर याला सहिष्णुता म्हणावं, सहनशीलता म्हणावं की नेभळेपणा म्हणावं, हा प्रश्न पडतो. कालपर्यंत उगाचच धमक्या देणारा ‘डोझियर’ मागणारा शेजारी देश शेपूट घालून गप्पा बसतो.
सर्व प्रकारच्या हिंसक अतिरेकी घटना दोन सर्जिकल स्ट्राईक केल्याबरोबर बंद पडलेल्या दिसतात. हा सगळा अनुभव असूनही हिंदू समाज असा गप्प बसलेला दिसतो तेव्हा सहिष्णुता, सहनशीलता आणि भेकडपणा यात फरक आहे, हे आपल्याच लोकांनी पुन्हा एकदा समजावून घेणे आवश्यक झाले आहे, असे वाटते. ज्या समाजाला आपण सहिष्णू वागणूक देतो, तो समाज जर आपल्याप्रती सहिष्णू नसेल आणि तरीही आपण एकतर्फी सहिष्णुता दाखवत असलो तर त्याला सहिष्णुता नव्हे, तर काही काळ सहनशीलता आणि नंतर भेकडपणा म्हणतात. Hindu Tolerance आपल्याच आतेभावाचे शंभर अपराध माफ करणा-या पण त्यानंतर त्याला मृत्युदंड देणा-या भगवान श्रीकृष्णाचे आपण वंशज आहोत. ज्या समाजाला तुमचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य नाही. ज्या समाजाला तुमची संस्कृती, धर्म, प्रथा परंपरा, श्रद्धा मान्य नाहीत. इतर धर्म-श्रद्धांना ‘कुफ्र’ ठरवून, जो समाज आजच्या काळातही इतर धर्मीयांना जगण्याचा अधिकार नाही या तत्त्वावर विश्वास असलेला आहे. ज्या समाजामुळे तुमच्या संस्कृतीचेच नव्हे तर तुमचेही जीवन धोक्यात आले आहे. त्या समाजाप्रती सहिष्णुता काय कामाची?<
Hindu Tolerance याला एक तर सहनशीलता म्हटले पाहिजे किंवा भेकडपणा म्हटले पाहिजे. कारण, एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असली, अपमानास्पद असली तरी जेव्हा समाज वा व्यक्ती शांत राहतो, तेव्हा तो सहनशील असतो. पण अशाच गोष्टी जेव्हा अनेक दशकं किंवा शतकं घडतं राहतात आणि कोणते तरी भेकड तत्त्वज्ञान सांगत ती व्यक्ती वा समाज त्यावर प्रतिक्रिया न देता, विरोध न करता शांत राहत असेल, तर ते नि:संशयपणे भेकडपणाचेच द्योतक असते. Hindu Tolerance मुस्लिम समाजाची सर्वसाधारण वर्तणूक, त्या समाजाची आक्रमकता, मुस्लिम विचारवंत या सगळ्या बाबतीत घेत असलेला पवित्रा आणि या सगळ्यांना तथाकथित पुरोगामी लिब्रांडूंची साथ या सगळ्या गोष्टींचा झडझडून सर्वांगांनी आणि सर्वार्थाने विरोध करण्याची वेळ आलेली आहे, हे निश्चित. अन्यथा इतिहास आमच्या कालखंडाची नोंद सहिष्णू आणि सहनशील समाज अशी न घेता, एक भेकडांचा कालखंड अशीच घेईल, हे समस्त हिंदू समाजाने ध्यानात घेतले पाहिजे.