सातपुड्यात आदिवासी संस्कृती व मूळबिज संवर्धनाचा निर्धार

मोलगी : गौरवशाली आदिवासी संस्कृतीचे खरेखुरे दर्शन आज केवळ सातपुड्यातच होते. टिकून असलेल्या या संस्कृतीचे संवर्धनही व्हावे, यासाठी ‘सातपुडा आदिवासी महापंचायत’ होणार आहे. या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर निंबीपाडा (ता.अक्कलकुवा) येथे सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी संस्कृतीसह आदिवासींचे गुणकारी मूळबिजांच्या संवर्धनाला योग्य दिशा देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

परक्या, स्वार्थी व बाजारू संस्कृतीमुळे आदिवासी संस्कृती ढासळली असली तरी धडगाव व मोलगी भागात मूळ संस्कृतीचे खरे दर्शन होते. या संस्कृतीचे होळी, दिवाळी, इंदल, गोवाण, निलीचाराय, वाघदेव, गावदेवती, आठिवटी या सण-उत्सवांसह इतिहासकारांमध्ये मोडवी, पुंजारा तर वाद्यांमध्ये ढोल, मांदल, तुतड्या, पिरी, सुंअंका, पावरा, कांगल हे प्रमुख घटक असून याच्यात अवघी आदिवासी संस्कृती सामावली आहे. संस्कृती संवर्धनासाठी हे घटकच जगासमोर येणे आवश्यक आहे, त्यांची शिकल्या सवरलेल्या पिढीला‌ ओळख करुन देणे, त्यांच्यकडून या गौरवशाली घटकांचा अवलंब केला जावा या उद्देशाने निंबीपाडा ता.अक्कलकुवा या पावन‌ भूमीत दि. १५ मार्च रोजी सातपुडा महापंचायत घेण्याचा‌ ठराव करण्यात आला.

सभेत ए.सी.वांवटीबेन वसावे, आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ दरबारसिंग पाडवी, कन्सीलेशन कमिटीचे सदस्य ए.सी.डॉ.दिलवरसिंग वसावे, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, माजी जि.प.सदस्य सिताराम राऊत, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, भारतीय आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड.अभिजित वसावे, जेलसिंग पावरा, करमसिंग पाडवी, ॲड.सरदारसिंग वसावे, तडवी रामा गुरुजी, डॉ.सायसिंग वसावे, धिरसिंग वळवी, जयसिंग वळवी, ब्रिजलाल पाडवी, कालुसिंग वसावे, करमसिंग वसावे, कुसालीबाई वसावे, सुनिता वसावे, इंदिरा वसावे आदी उपस्थित होते. दरम्यान जेलसिंग पावरा, करमसिंग पाडवी, दरबारसिंग पाडवी, सिताराम राऊत, भागीराम पाडवी, उमेश वसावे, कालुसिंग पाडवी यांनी मार्गदर्शन केले.

आदिवासी लग्न पद्धतीवर चर्चा करतांना कंन्सिलेशन कमिटीचे डॉ.दिलवरसिंग वसावे यांनी आज मुहूर्त काढून लावलेल्या लग्नात विघ्ने अधिक येत आहे, अशी शोकांतिका व्यक्त करत आदिवासींमध्ये लग्नासाठी कुठल्या मुहूर्ताची व ब्राह्मणाची गरज भासत नाही, आर्थिक दुर्बल कुटुंब पशूधनाच्या माध्यमातून आपल्या ! होतो, ताटातुट होत नाही. मात्र आज आपल्या‌ लेकीला वाचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. वसावे यांनी केले.