सानिया मिर्झाला सोडून शोएब अडकला विवाह बंधनात; कोण आहे तिसरी बायको?

नवी दिल्ली । पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्याची बातमी समोर आली आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. या विवाह सोहळ्यातील फोटो त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे दोघेही चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांमध्ये घटस्फोट झाल्याची चर्चा सुरु असताना शोएब मलिकने आज २० जानेवारी रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान आता लग्नाचे फोटो शेअर करत दोघांनीही या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. ती २०२० मध्ये उमेर जसवालसोबत विवाह बंधनात अडकली होती. मात्र दोघांचं नातं फार काळ टीकू शकलं नाही. त्यामुळे दोघांचा घटस्फोट झाला. शनिवारी त्याने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत हटके कॅप्शनही दिले आहे. २०१० मध्ये सानिया मिर्झासोबत विवाह करण्याआधी त्याने आयशा सिद्दीकीला घटस्फोट दिला होता.