‘सामंथा खूप प्रेमळ..’ घटस्फोटानंतर दाेन वर्षांनी नागा चैतन्य…

Samantha-Naga Chaitanya divorce : साऊथ अभिनेता नागा चैतन्य त्याच्या आगामी ‘कस्टडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू असून याच दरम्यानच्या एका मुलाखतीत नागा चैतन्य त्याच्या पर्सनल लाईफबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. यावेळी नागा चैतन्यने अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूच्या घटस्फोटोबद्दल प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला नागा चैतन्य?
‘आम्ही विभक्त होऊन दोन वर्षे पूर्ण झाली असून, घटस्फोटाची पूर्ण प्रक्रिया वर्षभरापूर्वी पार पडली आहे. न्यायालयाने आमचा घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटानंतर आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलो आहोत. मला माझ्या आयुष्यातील त्या काळाची खूपच आठवण येते. सामंथा खूप प्रेमळ मुलगी आहे. तिने तिच्या आयुष्यात आनंदात राहावे हीच माझी इच्छा आहे. परंतु, घटस्फोटादरम्यान आमच्याबद्दल ज्या चर्चा झाल्या त्याचा त्रास झाला. त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं.