वैभव करवंदकर
नंदुरबार : जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रौत्सव, म्हणजे सारंगखेडा यात्राउत्सव 21 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 दरम्यान होत आहे. यात्रा कालावधीत अवजड वाहनांमुळे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.
दोंडाईचाकडून शहादामार्गे गुजरातकडे जाणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुलीवरून नंदुरबार-प्रकाशामार्गे गुजरातकडे. तर गुजरात राज्याकडून अक्कलकुवा तळोदा मार्गे येणारी अवजड वाहने प्रकाशा पुलावरून नंदुरबारमार्गे दोंडाईचाकडे. आणि शहादाकडून दोंडाईचाकडे जाणारी अवजड वाहने शहादा-अनरद बारी, शिरपूर मार्गे व धुळेकडून शहादाकडे जाणारी अवजड वाहने सोनगीर फाट्यावरुन शिरपूर येथून वडाळी अनरद बारीमार्गे शहादाकडे याप्रमाणे अवजड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे.
नंदुरबार पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील. म्हणाले की, श्री. दत्त जयंतीनिमित्त एकमुखी दत्तप्रभु यांची यात्रा भरणार आहे. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गुजरात , मध्ये प्रदेश येथून दर्शनासाठी येत असतात. तेथे घोडेबाजार व बैलबाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळे घोडे व बैल यांची खदेरी विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रसिध्द् आहे. म्हणून यात्रौत्सवात येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाहने मंदिर परिसरात रस्त्यांवर किंवा इतरत्र पार्किंग करु नये, तसे आढळून आल्यास सदर वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.