सारा अली खान उज्जैनच्या महाकाल मंदिरात

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने बुधवारी, ३१ मे रोजी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात जावून दर्शन घेतले. तिथे ती भस्म आरतीही सहभागी झाली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा अली खान महाकाल मंदिरात हात जोडून उभी असल्याचे दिसत आहे त्यावेळी तिच्या डोक्यावर पदरही आहे. त्याआधी सारा अली खान आणि विकी कौशल लखनऊला गेले होते, जिथे त्यांनी हनुमान सेतू मंदिराला भेट दिली होती.

सध्या सारा तिच्या ’जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट २ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. संगीत सचिन-जिगर यांचे आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. लग्नाआधी दोघांमध्ये खूप प्रेम असते, पण लग्नानंतर सर्व काही बदलते. हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते.