सावधान ! जळगावच्या ‘या’ शहरात स्वाईन फ्लूने ८०० डुकरांचा मृत्यू

जळगाव : स्वाईन फ्लूनं जिल्ह्यात धडधड वाढवली आहे. जिल्ह्यातील यावल शहरात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूची लक्षणं आढळून आली आहेत. स्वाईन फ्लूमुळे तब्बल ८०० डूकरांचा मृत्यू झाल्याची माहिती यावल नगरपरिषदचे स्वच्छता अधिकारी सत्यम पाटील यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून आफ्रिकन स्वाईन फ्लू या विषाणुजन्य अशा आजाराने मोठ्याप्रमाणावर डुकरांचा मृत्यू होत आहे. मरण पावलेल्या डुकरांची दुर्गंधी ही अत्यंत वेगाने परिसरात पसरत असून नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात यावल नगर परिषदचे आरोग्य अधिकारी सत्यम पाटील यांच्याकडून जाणून  घेण्याचा प्रयत्न केला असता  “या जनावरांवर आफ्रिकन स्वाईन फ्लू या विषाणुजन्य आजाराची लागण झाली आहे. याची दक्षता घेत पशुसंवर्धन अधिकारी यांना याची जाणीव एक महीना आदीच करून दिली असल्याचे पाटील यांनी सांगीतले.

दरम्यान, या आजारामुळे आतापर्यंत सुमारे ८०० जनावरांचा मृत्यु झाला असल्याने उपाययोजना म्हणून नगर परिषदच्या माध्यमातून शेकडो जनावरे स्थलांतरीत करून ईतर ठीकाणी पाठविण्यात आल्याचे आरोग्य व स्वच्छता अधिकारी सत्यम पाटील यांनी सांगीतले.