सावधान ! पत्रकारास जीवे ठार मारण्याची धमकी, केली नऊ लाखांची मागणी

चोपडा : तालुक्यातील अडावद येथील एका पत्रकारास अज्ञाताने अनोळखी फोन नंबरवरुन ९ लाखांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय पैसे न दिल्यास ब्लॕकमेल करण्याचेही त्यांना धमकवण्यात आले. मोबाईल फोन हॕक झाल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनोळखी फोन नंबरवरुन जणू फोन काॕलांची मालिकाच  सुरु झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत माहिती अशी की, सध्या सोशल मिडीयावर फसव्या जाहिरातींचा सुळसुळाट सुरु असून, अनेकांना या जाळ्यात अडकवून पैसे कमविण्याचा धंदाच ठगांनी सुरु केला आहे. अशाच प्रकारे सोशल मिडीयावरील कमी व्याजदराच्या खाजगी कर्जाच्या कंपनी अॕपला येथील पत्रकार विजय उत्तम सोळंके यांनी आधारकार्ड, पॕन कार्ड व वैयक्तिक माहिती पुरवून घेतलेल्या कर्जापोटी अंतिम परतफेडीचे ५ हजार ५२५ रुपये अदा करुनही पुन्हा परतफेड करायला लावली. असे प्रकार वारंवार घडू लागल्याने मोबाईल फोन हॕक झाल्याचा संशय त्यांना आला.

मोबाईल फोन हॕक झाल्याने इतरही न घेतलेल्या कर्जासाठी हॕकर्स फोन करुन त्यांना त्रस्त करित आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनोळखी फोन नंबरवरुन या खाजगी युपीआय आयडीवर पैसै टाका अन्यथा ब्लॕकमेलींग करुन कुटूंबियांसह जीवे ठार मारु,  अशा धमक्या त्यांना मिळत आहेत.

एका ठगाने तर चक्क ९ लाख रुपयांची मागणी केली. नाहीतर ब्लॕकमेल करण्याची धमकी दिली आहे. फसवणूक करण्याच्या या प्रकारामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
सदर प्रकाराला आळा घालण्यासाठी विजय सोळंके यांनी जळगाव सायबर क्राईम पोलीसांची भेट घेवून सायबर क्राईम पोर्टलला आॕनलाईन तक्रार दाखल केली आहे.

तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोबाईल फोनवर येत असलेल्या जीवे ठार मारण्याच्या धमकी बाबत अडावद पो.स्टे.चे सपोनि संतोष चव्हाण यांना सदर प्रकाराची माहिती सांगुन तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सद्यस्थितीत अशा प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने शक्यतो अनोळखी नंबरवरुन येणारे काॕल शहानिशा करुनच उचलावेत त्याचप्रमाणे व्हाॕटसअॕपवरील अनोळखी नंबरवरुन तसेच ईतर सोशल मिडीयावर आलेल्या कुठल्याही मेसेजला क्लिक करु नये असे आवाहन सपोनि संतोष चव्हाण यांनी केले आहे.