छत्रपती संभाजीनगर : नगर महामार्गावरील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल टाकताना दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना नुकतीच घडली. घटनेनंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने आणि संबंधित दुचाकीस्वाराने समयसूचकता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिरासमोर शाकीर समर शेख (रा. नारायणपूर, ता. गंगापूर) हे फूलविक्रीचा व्यवसाय करतात. शाकीर शेख नगर महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. दुचाकीवर बसूनच त्यांनी ३०० रुपयांचे पेट्रोल टाकण्यास कर्मचाऱ्याला सांगितले.
पेट्रोल भरताना अचानक फोन वाजला आणि बाईक पेटली. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील घटना pic.twitter.com/4AHlFe7rgF
— Ruchika (@Ruchika66964659) June 11, 2024
पेट्रोल भरताना शेख यांच्या मोबाइलवर मेसेजची रिंग वाजल्याने त्यांनी वरच्या खिशातून मोबाइल बाहेर काढताच पेट्रोलच्या टाकीजवळ आग लागली. कर्मचारी विलास दगडू मोटे यांनी समयसूचकता दाखवून पेट्रोलचे नोझल खाली ठेवून तत्काळ आग शमविण्याचे उपकरण आणून आग आटोक्यात आणली. दुसरीकडे शाकीर यांनीसुद्धा दुचाकी दूर नेत पेट्रोलचा कॉक बंद केला. मोटे यांनी नोझलनंतर दुचाकीची आग शमविली.
सूचनांकडे दुर्लक्षपे
ट्रोल पंपावर मोबाइल वापरणे टाळावे, बाटलीत पेट्रोल देऊ नये इ. सूचना दिलेल्या असूनही सर्रासपणे पेट्रोल पंपावर मोबाइलचा वापर कर्मचारी, ग्राहकांकडून होतो.