नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये ताप येणे, खोकला, थकवा किंवा अशक्तपणा आदी लक्षणे दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कुट्टीपुरममध्ये काही दिवसांपूर्वी तापामुळे मृत्यू झालेल्या १३ वर्षांच्या मुलाला H1N1 व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी ही माहिती दिली.
स्वाइन फ्लूला H1N1 व्हायरस असंही म्हणतात. हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे जो सामान्य खोकला आणि सर्दीपासून सुरू होतो. हा एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. H1N1 व्हायरसची लक्षणं इतर फ्लू व्हायरससारखीच असतात. कोविड-१९ प्रमाणे, त्याच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणं आवश्यक असू शकतं. मुलांना कोणतीही लक्षणं आढळल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून योग्य उपचार दिले जातील आणि वेळेत उपचार करता येतील.
H1N1 व्हायरसची लक्षणं
– मधूनमधून ताप येणे.
– स्नायू दुखणे
– थंडी वाजणे
– खोकला
– घसा खवखवणे
– सर्दी
– डोळे लाल होणे
– शरीर दुखणे
– डोकेदुखी
– थकवा आणि अशक्तपणा