पाचोरा: तालुक्यातील बाळद येथे एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. विवाहितेने आत्महत्या केली नसून तिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध मयत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकीता हिचा विवाह पाचोरा तालुक्यातील बाळद येथील अनिल पवार यांच्यासोबत २३ मे २०१९ रोजी बाळद ता. पाचोरा येथे झाला होता. लग्नानंतर पती अनिल बापू पवार व सासरच्या मंडळींकडून निकीता हिचा शारिरीक व मानसिक छळ सुरु झाला. पती अनिल पवार हे निकीता हिच्याकडे माहेरून बॅण्ड घेण्यासाठी ५० हजार रुपये घेवुन ये अशी मागणी करत निकीता हिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होते.
मात्र निकीता हिच्या माहेरची परिस्थिती हालाकीची असल्याने निकीता होणारा त्रास सहन करत राहीली. अखेर ११ एप्रिल रोजी राहत्या घरात निकीता पवार या विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील संशयास्पद मृतदेह आढळून आला. मात्र निकीता हिने आत्महत्या केली नसुन तिला आत्महत्या करण्यास पतीसह सासरच्या मंडळींनी प्रवृत्त केल्यानेच निकीता हिने आपले जीवन संपविल्याचा आरोप मयत निकीताचा भाऊ विनोद अप्पा बोरसे यांनी केला आहे,
फिर्यादीवरून मयत निकीता हिचे पती अनिल बापू पवार,सासरे बापु शिवाजी पवार, सासु दगुबाई बापू पवार, जेठ समाधान बापू पवार यांचे विरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला ६३/२०२४,भादवी कलम ३०४(ब),३०६,४९८(अ)३२३,५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरील सर्व आरोपींना गुरुवारी रात्रीच अटक करण्यात आली या अटकेतील आरोपींना शुक्रवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे.