तरुण भारत लाईव्ह ।१२ सप्टेंबर २०२३। ज्योतिशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धीचा कारक मानला जातो. बुध ग्रहांमुळे व्यक्तीला व्यवस्थापन, व्यापार, शेयर, यामध्ये प्रचंड यश मिळते. १६ सप्टेंबर ला सिंह राशीत जाणार आहे. याच्या संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांना याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
या काळात मेष राशींच्या व्यक्तींना हा काळ आनंदाने भरलेला असेल तसेच विविध प्रकारचे लाभ तुम्हाला होतील. आरोग्य देखील या काळात सुधारेल. विद्यार्थाना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील.
मिथुन रास
या राशीच्या लोकांना हा काळ भरपूर यश देणारा असेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ शुभ असेल. आरोग्य चांगले राहील. आवडते भोजन मिळेल.
सिंह रास
या काळात या राशीच्या लोकांना पूर्वी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल. नोकरीत पदोन्न्नती होण्याची शक्यता आहे. हाती पैसा खेळता राहील. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील.