‘सीआयडी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका

मुंबई । ‘सीआयडी’ ही गुन्हेगारी विश्वावर आधारित मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व पात्र घराघरांत पोहोचले आहेत. मात्र याच दरम्यान, या मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ ​​दिनेश फडणीस यांच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे.

दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला असून यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 1 डिसेंबर रोजी अभिनेत्याला दाखल करण्यात आले. दयानंद शेट्टी यांनी याला दुजोरा दिला आहे.

दिनेश फडणवीस यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. ते लवकर घरी यावे अशी प्रार्थना, अशी पोस्ट दयानंद शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, दिनेश फडणीस यांनी 1998 ते 2018 अशी 20 वर्ष सीआयडी या प्रसिद्ध मालिकेमध्ये काम केले. गुन्हेगारी विश्वावर आधारित या मालिकेला कॉमेडीचा तडका त्यांनी दिला. यासह त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतही एक भूमिका साकारली होती. आमिर खानच्या ‘सरफरोश’ आणि ऋतिक रोशनच्या ‘सुपर-30’ चित्रपटातही ते दिसले होते.