सुंदर आणि चमकदार केसांसाठी करा हे घरगुती उपाय

तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। प्रत्येकाला आपले केस सुंदर, चमकदार आणि निरोगी असावं असं वाटत असत. पण सद्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्या केसांची योग्यरीत्या काळजी घेणं आपल्याला जमत नाही मग यामुळे केसांची वाढ थांबते. केसात कोंडा होणे, केस गळणे अशा अनेक प्रकारच्या समस्या उदभवतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्यांपासून आराम मिळवू शकता. या केसांची निगा राखण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

तुम्ही केसांना चांगले तेल लावू शकता आणि ते रात्रभर सोडू शकता. कारण तुम्हाला फक्त टाळूची मालिश करायची आहे. टाळूची मालिश केल्याने केस मजबूत होण्यास मदत होते. केसांच्या वाढीसाठी प्रथिने, जीवनसत्त्वे संतुलित आहार आवश्यक आहे.  बदाम, पालेभाज्या, बदाम यांसारखे पदार्थ केसांच्या वाढीसाठी खूप चांगले असतात, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन-डी केसांच्या वाढीस मदत करते. “उन्हाळ्यात केसांची वाढ वेगाने होते आणि हिवाळ्यात मंदावते. कारण केसांच्या वाढीमध्ये सूर्यप्रकाश महत्त्वाची भूमिका बजावतो. उन्हाळ्यात आपल्याला जास्त सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे केसांची वाढ होते. केसांची काळजी घेण्यासाठी कोरफड, मुलतानी माती, कांदा, सफरचंद सायडर व्हिनेगर इत्यादी अनेक नैसर्गिक उत्पादने उपलब्ध आहेत.