चेन्नई : आयपीएल २०२३च्या ६१व्या सामन्यानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक क्षण पाहावयास मिळाला. महान क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी धावत जावून महेंद्रसिंग धोनीचा ऑटोग्राफ चक्क शर्टवर घेतला. क्रिकेटप्रेमींनी हा क्षण डोळ्यात साठवून ठेवला. यावेळी संपूर्ण स्टेडियम माही-माहीच्या घोषणांनी दणाणले.
रविवारी रात्री सीएसके विरुध्द कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला गेला. धोनीच्या संघाने कदाचित सामना गमावला असेल, परंतु चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर त्यांच्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण मैदानाला चक्कर मारत होता, त्यात अचानक भारताचे महान फलंदाज लिटिल मास्टर गावसकर मागून आले आणि त्यांनी धोनीकडे त्यांच्या शर्टवर ऑटोग्राफ घेतली. कॉमेंट्री करणारे गावसकर सामना संपल्यानंतर पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी पोहोचले तेव्हा काही मिनिटांपूर्वी टीव्हीवर जगासमोर घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत.
पोस्ट मॅच शो दरम्यान सुनील गावसकर यांनी कॅमेरामनला शर्ट झूम करण्यास सांगितले कारण त्यांना माहीचा ऑटोग्राफ दाखवायचा होता. गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले, धोनीवर कोण प्रेम करत नाही? गेल्या काही वर्षांत त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे केले ते खूप अलौकिक आहे. मुख्य म्हणजे तो एक तरुण खेळाडूंचा आदर्श राहिला आहे. त्यामुळे अनेक तरुण त्याच्याकडे बघून शिकत आहेत. तो संपूर्ण टीमसोबत मैदानावर फेरफटका मारणार हे ऐकताच मी कोणाकडून तरी पेन उसना घेतला आणि शांतपणे माझ्याकडे ठेवला.
गावसकर भेटायला आल्याचे कळताच धोनीही थोडा थांबला. त्याने आपल्या चाहत्यांना भेटवसू देणे थोडा वेळ थांबवले. त्यानंतर एम.एस. आणि सुनील गावसकर यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. हे सर्व झाल्यावर धोनीने थेट आपला हात त्यांच्या शर्टच्या जवळ नेला. त्याने गावसकरांना त्यांच्या शर्टवर आपली ऑटोग्राफ दिली आणि त्या दोघांमध्ये स्मितहास्य पाहायला मिळाले. ऑटोग्राफ मिळाल्यावर गावसकर यांनी धोनीला मिठी मारली आणि त्यानंतर त्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या.
#dhoni #IPL2023 #CSKvsKKR pic.twitter.com/cFnCXfboXi
— Abhishek Padhan (@imabhishek12345) May 14, 2023
dhoni gavaskar