तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महानगरपालिकेच्या रोजा बाग येथील उर्दू प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकणारी लहान चिमुकली मुलगी वर्गात कोंडली गेल्याची घटना घडली. हि घटना वॉचमनच्या दुर्लक्षामुळे घडली असल्याचं आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेदरम्यान भरली होती. दुपारी २ वाजेला शाळेची सुट्टी झाल्यानंतर संबधित वॉचमन वर्ग खोलीची तपासणी न करता वर्गाला कुलूप लावून निघुन गेला. या वॉचमनच्या दुर्लक्षामुळे सदर मुलगी वर्गातच काही तास तशीच रडत राहिली. परंतु एका वर्गात लहान चिमुकल्या मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांनी शाळेचा दिशेने धाव घेत बघितलं असता , एक मुलगी वर्गात कोंडली गेल्याचे दिसले. तसेच वर्गाला कुलूप असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ वर्ग खोलीला लावलेले कुलूप तोडून त्या मुलीला वर्गाचा बाहेर काढले.
या घटनेची मनपा शिक्षण विभागाने दखल घेत वॉचमनच्या दुर्लक्षामुळे घटना घडली असल्याने त्याला तत्काळ कामावरुन काढून टाकलं असल्याची माहिती शिक्षण विभागणी दिली आहे. तसेच शाळेच्या मुख्यधापिकांकडून या घटनेचा खुलासा मागितला आहे.