मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. इंदूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अक्षय बम यांनी अर्ज मागे घेतला. उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आता रिंगणात नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अक्षय भाजप आमदार रमेश मेंडोला यांच्यासोबत गेले होते, असे सांगण्यात येत आहे.
भाजपने इंदूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना तिकीट दिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून सांगितले की, इंदूरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम जी यांचे पीएम मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये स्वागत आहे.