---Advertisement---

“सुशांत सिंह प्रकरणी योग्य माणसाला शिक्षा मिळणार”

---Advertisement---
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर बोलताना भाजप आमदार नितेश राणेंनी सुशांत सिंह प्रकरणाला उजाळा दिला आहे. चोर की दाढी में तिनका म्हणतात तसं आहे. सुशांत सिंह प्रकरणी योग्य माणसाला शिक्षा मिळणार, असे संकेत नितेश राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत.
राणे म्हणाले, “चोर की दाढी में तिनका म्हणतात तसं आहे. सुशांत सिंहची आत्महत्या होती तर कोर्टात जाण्याची काय गरज होती? लवकरच योग्य माणसाला शिक्षा मिळणार आहे. ललित पाटील महायुतीचा माणूस होता असं म्हणायचे. आता तो मोहरा कसा झाला? जेव्हा ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा ठाकरे गटाचे नेते जेलमध्ये असतील. ठाकरे गट उद्या नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहे. नाशिकमध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्रीवर मोर्चा काढावा. कारण ड्रग माफियांच्या सर्वात मोठा मित्र मातोश्रीवर आहे.”
“सुशांतसिंह मर्डर प्रकरणात आदित्य ठाकरेचा राजीनामा का घेतला नाही? आमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार ठाकरे गटाच्या नेत्यांना नाही. आर्थर रोड जेलची खोली साफ करण्याचे काम सुरु आहे. लवकरच संजय राऊतसाहेब तिकडे जातील. फडणवीस साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे, असं राऊत म्हणत आहेत. म्हणूनच तुझ्या मालकाची झोप उडाली आहे. मातोश्रीवरचा वाईनचा साठा संपला आहे.” असं नितेश राणे म्हणाले.
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment