सूक्ष्म कलेची दखल : चित्रकार ऐश्वर्या औसरकरचं नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

पाचोरा : प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत अनेक रत्न उदयास आलेले आहेत. कवी कुसुमाग्रजांच्या या पावन भुमीतून अनेक नामवंत कलाकारांनी विविध कला गुणांच्या माध्यमातून नाशिकचं नाव साता समुद्र पार नेलं आहे. आता सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवून नाशिकच्या  शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विशेषतः पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून संस्थेच्या संकेत स्थळावर अधीकृत घोषणा करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे कडधान्य म्हणजेच ‘मोहरी, तीळ, रवा, शेंगदाणा, साबुदाणा, मुंगडाळ, मठडाळ, राजमा, अशा विविध प्रकारच्या कडधान्यांवर विविध राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामधील नामवंत असणारे व्यक्तींचे हुबेहूब सूक्ष्म चित्र साकारून एक नवा विश्व विक्रम स्थापित केलाय. ज्यामध्ये   पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री छगनजी भुजबळ, मंत्री दादा भुसे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह नाशिक शहरातील लोक प्रतिनिधि आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. ढिकले,आमदार अपूर्व भाऊ हिरे, आ. सुहास अण्णा कांदे, महापौर विनायक  पांडे तसेच अनेक नामवंत कलाकारांचे व देव देवीतांचे चित्र काढलेय.

ऐश्वर्या औसरकर यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांचे रंगीत चित्र दैनंदीन आहारातील फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या; राईवर, जिचे मोजमाप हे अवघे ‘1.40 मी मी’ आहे. त्यावर कुठ्ल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता रंगीत चित्र काढलं. या सूक्ष्म कलेची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतलीय. विशेषतः पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून अधिकृत घोषणा संस्थेच्या अधीकृत संकेत स्थळावर करण्यात आलीय. या संदर्भातील प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व मेडल त्यांना दि ०८ ऑगस्ट २०२४ रोजी मिळाले आहे. त्यामुळे औसरकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पहिलीला असल्यापासूनच तिच्या अंगी चित्रकलेची आवड होती, सोबतच नवनवीन स्पर्धांमध्ये ती प्रथम क्रमांक मिळवायची. नाशिक शहरामध्ये गणपती उत्सव, दिवाळी,  दसरा या विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये तिने प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन वेळोवेळी आपली कला सादर केली. आपल्या कलेच्या माध्यमातून तीने अनेक संस्था सामाजिक, राजकीय शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून बक्षीस मिळवले, असल्याचे ऐश्वर्या औसरकर यांच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच तिच्या अंगी असलेल्या कलेचे कौतुक सर्वस्तरांतून केले जात आहे. एवढा मोठा सीक्रेट सुपरस्टार नाशिकमध्ये असताना, इतके दिवस का पुढे आला नाही अशी खंत देखील नाशिककरांनी बोलून दाखवलीय. याबाबत खुलासा करताना औसरकर यांनी सांगितले की, काही वैयक्तिक व घरगुती कारणांमुळे आपल्या अंगी असलेली कला दाखवता आली नाही याची देखील खंत ऐश्वर्या औसरकर यांनी बोलतांना सांगितले आहे, परंतु येत्या काही दिवसातच नाशिकसह स्वतःचं नाव सातासमुद्रा पार नेऊन स्वकर्तृत्वावर नवीन विश्व निर्माण करण्याचं नवीन विश्व निर्माण करण्याचा आत्मविश्वास ऐश्वर्या औसरकर यांनी जळगाव ‘तरुण भारत’शी बोलून दाखवला आहे.