---Advertisement---

सूर्याचा कन्या राशीत प्रवेश; या तीन राशींना सुवर्णकाळ

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ६ सप्टेंबर २०२३। सूर्य हा जीवन आणि ऊर्जेचा स्रोत मानला जातो. तो एक तेजस्वी ग्रह आहे. आता तो स्वराशी सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणामुळे काही तीन राशींच्या लोकांच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

वृषभ रास
या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील आणि त्या भविष्यात फायदेशीर ठरतील. व्यवसायात भरभराट होईल. वैवाहिक जीवन सुखाचे होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. एकंदरीतच हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असेल.

कर्क रास
या काळात तुम्हाला नशीबाची भरभरून साथ मिळेल. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीलाही जाऊ शकता. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सूर्यमार्ग तुमच्यासाठी चांगला राहील.

मकर रास 
या काळात उत्पनाचे अनेक मार्ग सापडतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ खूप शुभ आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. तब्येत चांगली राहील. मुलांकडून सुवार्ता मिळतील. सगळी कामे सुरळीत पार पडतील.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment