तरुण भारत लाईव्ह । ११ ऑक्टोबर २०२३। भारतीय ज्योतिशास्र्तात सूर्य ग्रहाला खूप महत्व आहे. सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलतात. सूर्य १८ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्याचा राशीबदल काही राशींच्या लोकांनसाठी खूप सकारात्मक ठरणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीच्या नवीन ऑफर मिळतील. करियर च्या दृष्टीने हा काळ शुभ असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात नफा होईल.
कर्क रास
या काळात कर्क राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. धार्मिक सहलीला जाण्याचा योग आहे. कुटुंबासोबत मजेत वेळ जाईल. आरोग्य चांगले राहील.
मीन रास
या काळात मीन राशींच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.