सॅमसंगचा नवा फोन धमाकेदार फीचर्ससह लवकरच होणार लाँच

तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। सॅमसंग कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवीन फोन बाजारात लाँच करत असते. अशातच सॅमसंगचा नवीन फोन बाजारात लवकरच लाँच होणार आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Galaxy S23 FE आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

या नवीन फोनमध्ये मागील बाजूस 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. तर समोर 10MP सेल्फी शूटर असू शकतो. या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी दिली जाईल. जी 25W चार्जिंग सपोर्टसह येईल. लीक झालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy S23 FE ४ ऑक्टोबरला लाँच होऊ शकतो. या फोनमध्ये 6.4 इंच AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. ज्यात फुल D+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो.

Samsung Galaxy S23 FE फोनबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. हा फोन पुढच्या महिन्यात लाँच केला जाणार आहे. samsung Galaxy S23 FE ची किंमत राज्यांनुसार बदलू शकते. या फोनची किंमत 599 डॉलरपासून सुरू होऊ शकते. हा फोन 8 GB रॅम आणि 128 स्टोरेजसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे.