सॅमसंगचे ‘बजेट स्मार्टफोन’ होणार लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। सॅमसंग हा भारतातील आणि जगभरातील लाखो ग्राहकांची आवडीची कंपनी आहे. खिशाला परवडणारे स्मार्टफोन बनवण्यासाठी कंपनीची ख्याती आहे. आता कंपनी आपला नवीन ‘बजेट स्मार्टफोन’ बाजारात आणण्याच्या तयारीत असून यामध्ये Samsung Galaxy A05 आणि Galaxy A05s हे नवे मॉडेल्स असतील. या दोन्ही मॉडेल्सचे फीचर्स आणि किंमत काय आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

Galaxy A05s मध्ये 6.7-इंचाचा  डिस्प्ले यामध्ये मिळेल. त्याचबरोबर  Galaxy A05 मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे.. Galaxy A05s मध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर दिला जाईल. तर Galaxy A05 मध्ये तुम्हाला MediaTek चा Helio G85 चीपसेट मिळेल. या दोन्ही फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज पर्याय असेल.

Galaxy A05s मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून  यामध्ये ५०MP वाइड अँगल लेन्स, २ MP डेप्थ कॅमेरा आणि २ MP मॅक्रो सेन्सर आहे. यामध्ये एक १३ MP फ्रंट कॅमेरा पण आहे. जर आपण Galaxy A05 बद्दल बोललो तर यात ५०MP वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा आणि २ MP डेप्थ कॅमेरा असेल. याशिवाय फोनमध्ये ८MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. दोन्ही फोनमध्ये २५W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,०० mAh बॅटरीची सोय करण्यात आली आहे.

Samsung Galaxy A05 आणि Galaxy A05s  पुढच्या आठवड्यात भारतात लॉन्च होणार असून Galaxy A05 ची किंमत 13,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तर Galaxy A05s ची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.