जळगाव : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील धबधबा कुंडात एक पर्यटन सेल्फी काढताना पाय घसरून पडला. सुदैवाने त्याला काही झाले नसून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. गोपाल पुंडलिक चव्हाण वय २७ असे युवकाचे नाव आहे.
गोपाल पुंडलिक चव्हाण हा अजिंठा लेणी पाहून धबधबा पाहण्यासाठी गेला. धबधबा पाहून सेल्फी घेताना पाय घसरून एक नंबरच्या कुंडा मध्ये पडला. त्याने क्षणीच सोबत असलेल्या मित्रांनी जोरदार आवाज दिला. त्यांनी तात्काळ फर्दापूर पोलीस स्टेशनला कळवले. पोलिसांनी तत्वरित घटनास्थळी दाखल होत दोरीच्या सह्हायाने युवकास सुखरूप बाहेर काढले.
यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे,पोलीस कर्मचारी निलेश लोखंडे, योगेश कोळी, योगेश खडके, विनोद कोळी तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील कर्मचारी यांनी मोठ्या प्रयत्नाने या युवकास सुखरूप बाहेर काढले. अवघड जागेवर जाऊन पर्यटकांनी सेल्फी वैगरे काढू नये, जीवन फार अनमोल आहे त्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सपोनि भरत मोरे यांनी केले.