सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये बदल ; खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी तपासून घ्या आजचे भाव

मुंबई । तुम्ही लग्नासाठी किंवा कौटुंबिक समारंभासाठी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल, तर आधी आजचा म्हणजेच २८ जानेवारीची नवीनतम किंमत तपासा. आज किमतींमध्ये बदल झाला असून नव्या किमतींनंतर सोन्याच्या दराने पुन्हा 63000 हजार रुपयाचा तटप्पा ओलांडला आहे. तर चांदीचा भाव 76000 च्या वर गेला आहे.

डिसेंबरच्या अखेरपासून आठवड्याच्या शेवटी किंमती वधारण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. तो या आठवड्यात पण दिसून आला. मात्र, या महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली.

या आठवड्याभरात सोने शंभर रुपयांनी स्वस्त झाले तर चांदी 1000 रुपयांनी महागली. बजेटपूर्वी सोने-चांदीत नरमाईचे सूर असले तरी बजेटनंतर किंमतीत किती वाढ होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

या आठवड्यात असे होते सोन्याचा दर
या आठवड्याच्या 24 आणि 25 जानेवारी रोजी सोने 50 रुपयांची घसरण झाली. तर 26 जानेवारी रोजी सकाळी दरवाढ झाली तर संध्याकाळी किंमतीत 100 रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा दर
जानेवारीत चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात पण चांदीत घसरण झाली. 23 जानेवारी रोजी 500 रुपयांची स्वस्ताई आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. 26 जानेवारी रोजी किंमतीत बदल दिसला नाही. तीन दिवसांत एकूण 1000 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.