सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर ; दुसऱ्या दिवशी इतक्या रुपयांनी घसरले भाव..

मुंबई । सोने आणि चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना खुशखबर आहे. ती म्हणजेच व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती घसरण दिसून आली आहे. आज मंगळवारी सकाळी बाजारात दोन्ही धातूंचे भाव लाल रंगात उघडले.

यावेळी सोन्याचा दर 100 रुपयांनी तर चांदी 110 रुपयांनी स्वस्त झाली. यानंतर देशात 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,008 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,190 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 74,260 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोन्या-चांदीचा दर?

जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याबद्दल बोललो, तर सोन्याची किंमत 0.35 टक्क्यांनी म्हणजेच 219 रुपयांच्या घसरणीसह 62,072 वर ट्रेंड करत आहे. तर MCX वर चांदीची किंमत 0.15 टक्क्यांनी घसरून 113 रुपये 74,297 वर आली आहे.

देशातील बड्या शहरातील दर

राजधानी दिल्लीत सोन्याचा दर (22 कॅरेट) 56,833 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त झाला आहे. तर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत दिल्लीत 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव येथे 74,060 रुपये प्रति किलो आहे. मुंबई महानगरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,934 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. येथील चांदीचा भाव 74,190 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये सोनं (22 कॅरेट) प्रति 10 ग्रॅम 56,861 रुपये आणि 24 कॅरेट सोनं 62,030 रुपये प्रति 10 ग्रॅम दरानं विकलं जात आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर?

जळगावच्या सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 57,150 रुपये इतका आहे तर 24कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी62,400रुपये इतका आहे. तर चांदीचा दर 75,000रुपयावर आहे.