सोने-चांदीच्या किंमतींनी घेतली मोठी भरारी ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव । सोने-चांदीचा आलेख उंचावला आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा प्रतिकूल परिणाम भारतीय बाजारात दिसून येत असल्यामुळे सोने-चांदीच्या किंमतींनी मोठी भरारी घेतली. सोने-चांदी पुन्हा विक्रमाला गवसणी घालण्याच्या अगदी जवळ आहे. लग्नसराईत दागदागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आल्या पावली परत जाण्याची वेळ आली आहे. तुम्हालाही सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर त्याआधी आजचा नवीन दर तपासून घ्या..

जळगाव च्या सुवर्णनगरीत गुरुवारी सोने दर ५०० रुपयांनी वाढून ६६, १२६ वर पोहोचले. यापूर्वी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ६६२२९ (जीएसटीसह) या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.  ते उच्चांकी दराच्या अवघ्या १०३ रुपये मागे आहे.

वर्ष संपण्यास आता अवघे दोन दिवस (वर्किंग) बाकी असताना सोने उच्चांकी दराची पातळी पार करून नवा टप्पा गाठेल याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.सध्या जळगावात जीएसटीसह सोन्याचा दर ६६,१२६ रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५८,८१० रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६४,२०० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७६,२०० रुपये इतका आहे.