मुंबई । दिवाळीपासून सोने-चांदीने धडाधड रेकॉर्ड नावावर नोंदवले. ४ डिसेंबर रोजी सोन्यासह चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने सोने पहिल्यांदाच विनाजीएसटी ६४ हजार रुपयांवर गेला होता. तर चांदीचा दर तब्बल ७८ हजार रुपयांवर गेला होता. त्यामुळे लग्नसराईत सोने खरेदी करण्याच्या उत्साहावर विरजण पडले होते
मात्र सध्या सोने-चांदीच्या किंमतीला पुन्हा लगाम लागला. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने ग्राहकांना बळ दिले. सलग तीन दिवस भाव उतरल्याने ग्राहकांनी जमके खरेदी केली. मात्र गुरुवारी भावात जोरदार वाढ झाली. शुक्रवारी पुन्हा दरवाढ झाली. शनिवारी मात्र मौल्यवान धातूने ग्राहकांना दिलासा दिला.
आठवड्याच्या सुरुवातीला 11 डिसेंबर रोजी आणि 12 डिसेंबर रोजी सोने प्रत्येकी 220 रुपये, बुधवारी 13 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी उतरले. या तीन दिवसांत सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. 14 डिसेंबर रोजी सोन्यात 1 हजार रुपयांची वाढ झाली. 15 डिसेंबर रोजी सोने 100 रुपयांनी वधारले. 16 डिसेंबर रोजी 450 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 800 रुपयांची घसरण
आठवड्याच्या सुरुवातीला चांदी हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. गुरुवारी चांदीने 2500 रुपयांची उसळी घेतली. 15 डिसेंबर रोजी चांदीत एक हजारांची वाढ झाली. दोन दिवसांत चांदी 3500 रुपयांनी वाढली. 16 डिसेंबर रोजी चांदीत 800 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,700 रुपये आहे.