सोने-चांदीच्या किमतीने घेतली पुन्हा मोठी उसळी ; तपासून घ्या आजचे दर

जळगाव | या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात  सातत्याने घसरण दिसून आली.  या घसरणीनंतर सोन्यासह चांदीच्या किमतीत ७ महिन्याच्या नीच्चांकीवर आल्या होत्या. मात्र इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्धामुळे सोने आणि चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली. यामुळे सणासुदीत सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

आजचा दर?
जळगावच्या सुवर्णनगरीत सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 73,000 रुपयांवर गेला आहे.

दरम्यान, यापूर्वी गेल्या आठवड्यात (13 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 59000 रुपयावर होता. तर चांदीचा दर 70000 हजारांवर होता. मात्र गेल्या सात दिवसात सोने 2000 रुपयाने तर चांदी 3000 रुपयांनी वधारली आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
दरम्यान, आज शुक्रवारी सराफा बाजार हिरव्या चिन्हाने उघडला आणि दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत 0.47 टक्क्यांनी म्हणजेच 282 रुपयांनी महाग होत आहे आणि 60,600 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव आता 0.38 टक्क्यांनी म्हणजेच 269 रुपयांच्या वाढीनंतर 71,885 रुपये प्रति किलोवर आहे.