जळगाव । तुळशी विवाहसह देशभर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला. या दरम्यान सोने आणि चांदीला मोठी मागणी असते. मात्र ऐन लग्नाच्या हंगामात सोन्याच्या किमतींनी मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आणि जोरदार मुसंडी घेत दर गगनाला भिडले. चांदीच्या किमतीनेही जोरदार मुसंडी घेतली. या दरवाढीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फोडला आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.दरम्यान, या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचे रेकॉर्डच मोडले नाही तर नवीन विक्रम पण केले. या आठवड्यात सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. 30 नोव्हेंबर रोजी भावात 650 रुपयांची घसरण झाली. तर 1 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची दरवाढ झाली.
चांदीचा दर
गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी महाग झाली. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली. 1 डिसेंबर रोजी 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,500 रुपये आहे.