इस्रायल-इराण तणाव वाढत असून, सोन्या-चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानत आहेत आणि दुसरीकडे त्याच्या वाढत्या किमतींमुळे खरेदीदारांना प्रश्न निर्माण झाला आहे.
इराण-इस्रायल युद्धाच्या तणावाच्या काळात सोन्याने अलीकडेच ७४ हजारांचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत भविष्यात सोने-चांदी आणखी महाग होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.