सोने – चांदी सात महिन्यांच्या नीचांकावर; आजचा प्रति तोळ्याचा दर काय?

तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। मागील गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. गणेश उत्सव संपवून पितृपक्ष सुरू झाल्यानंतर आठवडाभरात सोने १४०० रुपयांनी तर चांदी चार हजार शंभर रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे सोने ५७,६०० रुपये  प्रति तोळा आहे. चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. असं असले तरी सध्या भारतात सुरु असलेल्या पितृपक्षामुळे अनेक जणांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर घसरणीला ब्रेक लागला आहे. बाजाराच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदी हिरव्या चिन्हाने व्यवहार करत आहे. सकाळी दहा  वाजेपर्यंत सोनं १६० रुपयांनी वाढून ५६,८८१ रुपये प्रति १० ग्रॅमने व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर ५४८ रुपयांनी वाढून ६७,४३३ प्रति किलोने व्यवहार करत आहे.

सोने चांदीचा हा गेल्या सात महिन्यातील नीचांकी भाव आहे काही दिवसांपासून सोने एकूण ६० हजार रुपयांच्या पुढे होते पितृपक्ष सुरू झाल्यानंतर त्याचे भाव कमी होऊन लागले २७ सप्टेंबर रोजी५९ हजार रुपयांवरती होते त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी दिवशी सोने ५८ हजार दोनशे रुपये प्रति तोळावर आले  ६ऑक्टोबरला दोनशे रुपयांची वाढ होऊन सोने ५७ हजार सहाशे रुपयांवर पोहोचले चांदी देखील ६७ हजार ९०० रुपयांवर आली आहे. मार्च महिन्यानंतरचे हे नेहमीच आणखी भाव आहेत याआधी १३ मार्च रोजी सोने सत्तावन्न हजार दोनशे रुपयांवर होते त्यानंतर ते कायम ५८००० राहिले.