जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजाराचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला. देशाची राजधानी दिल्लीत गुरुवारच्या व्यवहारात सोने 250 रुपयांनी स्वस्त झाले. सोने 250 रुपयांनी कमी झाल्यानंतर आता दहा ग्रॅम सोन्याचा भाव 73.700 रुपये झाला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 73,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांच्या मते, दिल्लीच्या बाजारात सोन्याची स्पॉट किंमत (24 कॅरेट) प्रति 10 ग्रॅम 73,700 रुपये होती, जी मागील बंद किंमतीपेक्षा 250 रुपयांची घसरण दर्शवते. सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव प्रतिकिलो 86,500 रुपये राहिला. यापूर्वी बुधवारी रामनवमीनिमित्त सराफा बाजार बंद ठेवण्यात आला होता.