मुंबई । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्टी पातळीपासून वर-खाली होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींनी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या पंधरवड्यात दिलासा दिला. 15 दिवसांत सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी उतरली.
दरम्यान, आज सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, आजचा सोन्याचा चांदीचा दर काय आहे हे जाणून घ्या. आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज सोन्याची किंमत 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे.
आजचा सोन्याचा दर
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6305 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,290 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आहे.
आज चांदीचा भाव काय?
आज चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,500 रुपये प्रति किलो आहे. शनिवारी एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये होता.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
मुंबई – मुंबईत सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
पुणे – आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम (
नाशिक – 24 कॅरेट सोने 63080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नागपूर – 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोल्हापूर – 24 कॅरेट सोने 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जळगाव – 24 कॅरेट सोने 63100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.