सोन्याच्या दर स्थिर, मात्र चांदी पुन्हा वधारली ; खरेदीपूर्वी तपासून घ्या आजचा नवीन दर?

जळगाव : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्ही खाली आले होते. मात्र त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातू वेगाचा विक्रम करत आहेत. आज गुरुवारी सकाळी सोन्याच्या दर स्थिर दिसून आला आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. दरम्यान,  दिवाळीच्या मोसमात सोने 65,000 रुपये आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जळगावात आजचा सोन्याचा दर काय?

जळगाव सुवर्ण नगरीत आज सोन्याचा भाव स्थिर दिसत आहे. आज गुरुवारी सकाळी 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 61,100 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. काल सकाळी देखील हाच दर होता.

चांदीचा आजचा दर

दुसरीकडे चांदीच्या किमतीने आज पुन्हा वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी चांदीचा एक किलोचा भाव 76,500 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी चांदीचा दर 76000 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात 500 रुपयाची वाढ झाली आहे.

दरम्यान, काही दिवसावर अक्षय तृतीय सारखा सण येऊन ठेपला आहे. यंदा हा सण 22 एप्रिल रोजी आहे. यादिवशी या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना घाम आला आहे. पुढील आठवड्यात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 63 हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.