सोन्यासह चांदीनेही घेतली भरारी ; जळगावच्या सुवर्णनगरीत इतका आहे 10 ग्रॅमचा भाव

जळगाव । सोन्या-चांदीचे भाव चांगलेच भडकले असून किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. किंबहुना, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही दिसून येत आहे. देशातील सुवर्णपेठ असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने कमाल दरवाढ नोंदवली.

दरवाढींमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून सराफा बाजारात खरेदीसाठी गेलेला ग्राहक हिरमसून बाहेर पडत आहे.  जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केला. दुसरीकडे चांदीनेही 80 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

सोन्याचा दर :
‘जीएसटी’ सह सोन्याचे दर प्रतितोळा ७१ हजार ४८२ रुपयांवर पोहचला आहे. यापूर्वी ९ मार्च रोजी सोने ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले होते. तर जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. पण आता सोन्याने मोठी झेप घेतली आहे.

चांदीचा दर
दुसरीकडे जळगावात चांदीचे दर ८० हजार ३४० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. ६ मार्च रोजी ७२ हजार ८०० रुपये असलेल्या चांदीच्या दारातही दोनच दिवसात १२०० रुपये वाढ झाली. चांदीचे दर ७४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. ५ ते २९ मार्चदरम्यान २४ दिवसांत सोन्याच्या दरात ६ हजारांची, तर चांदीच्या दरात ३ हजारांची वाढ नोंदविण्यात आली आहे.