जळगाव : सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आणखी थोडं थांबा कारण आज पुन्हा सोने महाग झाले आहे. सोबतच चांदीनेही मोठी उसळी घेतली आहे.
आजचा सोन्याचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत आज बुधवारी सकाळी 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 61,100 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. जळगावात गेल्या दोन दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 900 रुपयाची वाढ झाली आहे. आगामी येत्या काही दिवसात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 63 हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
आजचा चांदीचा दर
दुसरीकडे आज बुधवारी सकाळी चांदीचा एक किलोचा भाव 76,000 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. गेल्या दिवसात चांदीचा भाव तब्बल 1600 रुपयाची वाढ झाली आहे.
सोन्यावरील हॉलमार्क महत्त्वाचे
१ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी गोल्ड हॉलमार्किंगचा नियम लागू झाला आहे. दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोने वापरले जाते, जे केवळ ९१.६% शुद्ध असते कारण २४ कॅरेट शुद्ध सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत म्हणूनच त्यात मिश्रण घातले जाते आणि दागिने ८९ किंवा ९०% शुद्ध सोन्यापासून बनवले जातात, ज्याला २२ कॅरेट सोने म्हणतात. अशा स्थिती जर तुम्ही दागिने विकत घेत असाल तर त्याचे हॉलमार्क नक्की तपासा. जर हॉलमार्क ३७५ असेल तर सोने ३७.५% शुद्ध सोने आहे, तसेच जर दागिन्यांवर ५८५ लिहिलेले असेल तर सोने ५८.५ टक्के शुद्ध आहे.