सोयाबीन चिली रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ८ सप्टेंबर २०२३। संध्याकाळी भूक लागली कि काहीतरी वेगळं खावंसं वाटतं पण वेगळं करावं तरी काय? हा प्रश्न पडतो मग अशावेळी तुम्ही सोयाबिन चिली ट्राय करू शकता. हा पदार्थ घरी करायला सुद्धा खूप सोप्पं आहे. सोयाबीन चिली घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
सोयाबीन, कांदे, सिमला मिरची, कोबी, हिरवी मिरची, तीळ, लसूण, तिखट, गरम मसाला, मक्याचे पीठ, तांदळाचे पीठ, सोया चिली टॉमॅटो सॉस, मीठ, तेल.

कृती
सर्वप्रथम, सोयाबीन उकडून घ्यावेत. यानंतर मका आणि तांदळाचे पीठ एकत्र करून घ्यावे चवीनुसार मीठ गरम मसाला घालून घट्ट मिश्रण बनवून घ्या यामध्ये उकडलेले सोयाबीन घालावे नंतर गरम तेलात तळून घ्यावे यानंतर सिमला मिरची आणि कांदे तळून घ्यावे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कोबी, लसूण, हिरवी मिरची एकत्र दुसऱ्या कढईत अथवा फ्राय पॅनमध्ये छान एकत्र गरम करून, त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकून छान गरम करा. त्यात आता तळलेल्या सोयाबीन वड्या, कांदा, सिमला मिरची टाकून छान एकत्र जरा गरम करा, मग त्यावर सफेद तीळ घालून गरम गरम सर्व्ह करा.