जळगाव : शहरातील नूतन मराठा महाविद्यालय, MITCON कन्सल्टन्सी व इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात उत्तर महाराष्ट्र क्षेत्रातील विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर विद्यार्थ्यांसाठीही विविध विषयी माहिती देण्यात येणार आहे.
ज्यामध्ये सोलर पॅनल डिझाईन इन्स्टॉलेशन अँड नेट मॉनिटरिंग, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ सोलर पॅनल, सोलर प्रोजेक्ट मॅनेजमेंट,सौर पॅनल मार्केटिंग, लोड कॅल्क्युलेशन अँड एस्टिमेट, इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरियस स्कीम ऑफ सेंट्रल अँड स्टेट goverment, इत्यादी बद्दल माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करून त्यात जॉब प्लेसमेंट पण करण्यात येणार आहे त्यासाठी नूतन मराठा महाविद्यालयात सौरऊर्जेची लॅब MITCON तर्फे तयार करण्यात आलेली आहे.
याबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन ५ रोजी अकरा वाजता महाविद्यालयाच्या बोस सभागृहात एलसीडी प्रोजेक्टर वर MITCON तर्फे औरंगाबाद विभागीय अधिकारी विश्वनाथ दामोदर यांच्यातर्फे देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील, उद्घाटक म्हणून पीजी कॉर्डिनेटर डॉ.के .बी. पाटील , सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर.बी .देशमुख , मिटकॉन कन्सल्टन्सी व इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड, पुणे उत्तर महाराष्ट्र क्षेत्राचे सेंटर हेड श्री विवेक सैंदाणे आदी उपस्थित होते. मिटकॉन तर्फे पुढील काही दिवसात लगेचच प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे , या सामंजस्य करारासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. पी. देशमुख यांची महत्त्वाची भूमिका होती.