सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये भरतीची जाहिरात जारी करण्यात आलीय. तुम्हाला बँकेत अधिकारी व्हायचे असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत, व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक), सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक), सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार (CDBA) ही पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
SBI च्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 131 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवार 04 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
भरण्यात येणारी पदे
असिस्टंट मॅनेजर (सुरक्षा विश्लेषक) – २३ पदे
उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) – ५१ पदे
व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) – 03 पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर (ॲप्लिकेशन सिक्युरिटी) – 03 पदे
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार (CDBA) – 01 पदे
व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक) – ५० पदे
अर्ज फी किती आहे?
अधिकृत अधिसूचनेनुसार, सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे. तर SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पात्रता
व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक): या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर (कोणत्याही विषयातील) आणि MBA (वित्त) / PGDBA / PGDBM / MMS (वित्त) / CA / CFA/ICWA असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेत दिलेली वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही अर्ज करण्यास पात्र ठरू शकता.
जाहिरात पहा : PDF