मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यासाठी महाभरती जाहीर करण्यात आली होती. या महाभरतीसाठी जवळपास लाखोंच्या संख्येने अर्ज भरण्यात आले होते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही महाभरती करण्यात आली होती. परंतु, २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी त्यावेळी शुल्क भरलेले एकूण २१ कोटी ६७ लाख रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार असून याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, आता सरकारकडून २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी विध्यार्थ्यांनी भरलेले शुल्क त्यांना परत मिळणार आहे. २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेली महाभरती वादग्रस्त ठरल्याने रद्द करण्यात आली. परंतु, परीक्षार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क त्यांना अद्याप दिले गेले नव्हते. त्यासंबंधी आता राज्य सरकारकडून महाभरती दरम्यान भरले गेलेले शुल्क परत मिळणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.