FIFA Women’s World Cup Final: स्पेनने वूमेन्स फुटबॉल वर्ल्ड कप २०२३ जिंकत इतिहास रचला आहे. सिडनी ऑलिम्पिक स्टेडियममध्ये रविवारी इंग्लंड आणि स्पेनदरम्यान सामना झाला. या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडला १-० ने पराभूत केले. स्पेनने इतिहास रचत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे.
स्पेन संघाने फिफाचा विश्वचषकात इंग्लंडाचा पराभव केल्यामुळे त्यांचं मोठं स्वप्न भंगलं आहे. या सामन्यात इंग्लंडला गोल करण्याची संधीच मिळाली नाही. सरीना विगमॅनने हेड कोच मॅनेजर झाल्यानंतर महिला इंग्लंड संघ पहिल्यांदा हरली आहे. या अंतिम सामन्याआधी इंग्लंडने २५ सामने जिंकले होते. तर चार सामने ड्रॉ झाले होते. स्पेन वूमेन्स विश्वचषक जिंकणारा पाच देश ठरला आहे.
फिफा वूमेन्स विश्वचषक याआधी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नॉर्वे, जपान, जर्मनीने जिंकला आहे. यामुळे स्पेन फिफा वूमेन्स विश्वचषक जिंकणारा पाचवा देश ठरला आहे.
फिफा वूमेन्स विश्वचषक स्पर्धेचा हा ९ वा सिझन होता. न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २० जुलै ते २० ऑगस्टपर्यंत खेळण्यात आला. या विश्वचषकात एकूण ६४ सामने खेळण्यात आले. या सामन्यांचं आयोजन ९ शहरांतील १० मैदानांवर करण्यात आलं होतं.
या विश्वचषकात ३२ संघांनी भाग घेतला होता. तर गेल्यावेळी २४ संघांनी भाग घेतला होता. मागील विश्वचषक हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संघाने जिंकला होता. परंतु यंदा हा संघ उपांत्य फेरीही गाठू शकला नाही. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संघाने चारवेळा विश्वचषक जिंकला आहे.